HW News Marathi
महाराष्ट्र

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोरेगाव येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये बूथ स्तरीय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या महासंमेलनमध्ये व्यक्त केला. राहुल गांधी पुढे असे देखील म्हटले की, भाजपचा कर्नाटकात पराभव झाला असून गुजरातमध्ये त्यांनी स्वत:ला कसेबसे वाचवले. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही त्यांचा पराभव होईल, असे वक्तव्य राहुल यावेळी बोलत होते.

मोदी सरकार महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांनर काहीच बोलत नाहीत. या तिन्ही समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार आणि ही लढाई आम्ही नक्की जिंकू असा आत्मविश्वास राहुल यांनी यावेळी व्यक्त केला.

जर भाजपला कोणी हरवेल तर फक्त काँग्रेसची विचारधारा हरवू शकते. तसेच काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रक्षण करण्याचे काम माझे आहे. काँग्रेस पार्टी ही नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची पार्टी आहे. जिथे भाजप आणि आरएसएसचे लोक आग लावतील तिथे तिथे जाऊन तुम्ही पाणी टाका आणि ती आग विझवा, असे राहुल यांनी कार्यकर्तांना संबोधित करताना सांगितले.

या महासंमेलनात राहुल गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या शक्ती कँम्पेन या प्रोजेक्टचे अनावरण करुन एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. मुंबई ज्याप्रमाणे सर्व वर्गातील लोकांना सामावून घेते. त्याचप्रमाणे काँग्रेस देखील प्रत्येक वर्गातील व्यक्ती सामावून घेते. आणि काँग्रेसमध्ये सर्वजण मिळून काम करतात, मुंबईतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी भाजपचा खरपूस समाचार घेतला. या महासंमेलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, राजू वाघमारे यांच्यासह मुंबतील काँग्रेस नेते मंडळी यावेळी उपस्थित होते.

Related posts

रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! भाजपचा सेनेवर वार

News Desk

नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडही आता थेट जनतेतून

News Desk

महाराष्ट्रात प्रत्येक कारवाई ‘ही’ कायद्याने होणार!, राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna