HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात प्रत्येक कारवाई ‘ही’ कायद्याने होणार!, राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. येथे प्रत्येक कारवाई ही कायद्याने होते,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार रवी राणा आणि त्यांची खासदार नवनीत राणा यांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीनंतर दिली. राणा दाम्पत्यांनी ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसावरून झालेल्या नाट्यानंतर पोलिसांनी काल (२३ एप्रिल) अटक केले होते. यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याना आज (२४ एप्रिल) वांद्रे न्यायालयात हजर केले. राणा दाम्पत्याना पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणांचा आर्थर रोड कारागृहात मुक्काम असणार आहे.

राऊत म्हणाले, “न्यायालयाचा निर्णय असून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. आणि प्रत्येक कारवाई ही कायद्याने होत आहे. राणा दाम्पत्याद्वारे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून सदावर्ते, राणा दाम्पत्य आणि यामागे भाजप आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशी कारस्थाने करत असेल तर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक विचारवंत, लेख, कवि यांना अटक करण्यात आली असून राज्य उलथवण्याचा कट असल्याचा आरोप मागच्या सरकारने लावला होता. आणि आता ते बोलत असून त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये.”

राणा दाम्पत्याविरोधात राणा दाम्पत्यावर १२४ (अ) सेडिशन अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिली आहे. प्रदीप घरत यांनी म्हटले, “मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचे असेल तर परवानगी गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्ध वापरुन त्यांनी चॅलेंज केले. राणा दाम्पत्यांनी नोटिशीला न जुमान त्यांनी शासनाला आव्हान दिले. यामुळे राणा दाम्पत्याविरोधात १२४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे सरकारी वकील प्रदीप घरात यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार

News Desk

गँगस्टार शरद मोहोळच्या पत्नीने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, प्रवेश मात्र टाळला!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली बारामती येथील विकासकामांची पाहणी

News Desk