मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी फिरावे अशी सूचना दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे अंधेरी, वांद्रे, भिवंडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मास्कचा अवैध साठा जप्त केला आहे. मुंबईच्या क्राईम ब्राँच युनिट ९ ने ही कारवाई केली आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे ही घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, मास्कचा बेकायदेशीर साठा करुन काळाबाजार केल्याप्रकरणी वांद्रे येथे सापडेल्या दोषींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीव शेलार यांनी ट्विटही केले आहे. त्यात त्यांनी हा काळा बाजार करण्यांवर सरकारने आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी असा आशय लिहिला आहे.
Applaud @Mumbaipolice Bandra Crime branch Unit 9team led by Sr PI Desai 4 seizing 25 lac N95 masks worth crores smuggled for black marketing ! #MVA Govt must crack down & slap MCOCA on all such black marketing activity in this time of crisis ! @CMOMaharashtra
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 24, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. मात्र अशा परिस्थितीत काही जणांकडून मास्कचा काळाबाजार सुरु आहे. मुंबईतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आलेल्या मास्कचा साठा करणाऱ्यांवर वांद्रे परिसरात आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास १५-२० कोटींचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी बांद्रे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाई बद्दल आमदार अँड. आशिष शेलार यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच या प्रकारणी दोषी असणाऱ्यांंवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.