HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेचे आज बजेट सादर होणार

मुंबई | मुंबई महापालिकाचे बजेट आज (३ फेब्रुवारी) सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात ‘अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली होती. असं असतानाच उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार का? मुंबईकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातील? याकडं लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे. गेलं आर्थिक वर्ष कोविडमध्ये गेल्याने अपेक्षित उत्पन्नाच्या केवळ 25 ते 30 टक्के महसूल आतापर्यंत जमा झाला आहे. कोरोनामुळेच जाहिरातदार, हॉटेल, बिल्डरांना प्रिमियमध्ये सूट देण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईकरांवर यावर्षी करवाढ टळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा महापालिकेच्या तिजोरीत आवक कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. 500 स्क्वे फुटांपर्यंतच्या घरांचा केवळ सर्वसाधारण कर माफ झाला आहे. त्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा अशी मागणी जोर धरते आहे. दरवर्षी बजेटमध्ये साधारण 8 ते 10 % ची वाढ होते. यंदाही बजेटचा आकडा 8 ते 10 %नी वाढेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 33, 441 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेने मांडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाही”, धनंजय मुंडे गरजले

News Desk

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपचे वर्चस्व; महाविकासआघाडीला धक्का

Aprna

विधानभवनाच्या परिसरात नितेश राणे-अबू आझमी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरुन आमने-सामने

Aprna