HW News Marathi
महाराष्ट्र

BMC Budget 2022-23 : शिक्षण समितीचा ३ हजार ३७० कोटीचा अर्थसंकल्प सादर, विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणावर भर

मुंबई | आशियातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिकाचा २०२२-२३ या वर्षाचा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. पालिकेने आज (३ फेब्रुवारी) शिक्षण समितीचा ३ हजार ३७० कोटींचा अर्थसंकल्प  सादर केला आहे. पालिका उपायुक्त अजित कुमार यांनी शिक्षण समितीच्या अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पालिकेने विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आले आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शाळा बंद होत्या. परंतु, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. 

दरम्यान, पालिका शाळांमधील २ हजार ५१४ वर्ग खोल्या डिजिटल क्लासरूमसाठी २८ लाख रुपये खर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरसाठी ३८ कोटी २ लाख रुपये, शाळा इमारती दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी ४१९ कोटी पालिकेने शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पात केले आहे. आणि शाळांची देखभाल आणि स्वच्छतेसाठी ७५ कोटी पालिकेकडून खर्च करण्यात आला आहे. तसेच पालिकेने त्यांच्या अर्थसंकल्पात टॅब योजनेसाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गुगल मीट, झूम, युट्यूब द्वारे शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी १९ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच संगीत अकदमीसाठी १४ लाखची तरतूद करण्यात आली. 

पालिकेने विद्यार्थ्यांसाठी टॅब,  वह्या गणवेश, बुट-मोजे स्टेशनरी, सँडल, स्कूल किट, कॅनव्हास शूज व स्पोर्ट्स युनिफॉर्म आदि गोष्टी देण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी पालिकेने १०० कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्याच बरोबर पालिकाच्या प्राथमिक शालेतील मुलींच्या उपस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी ७ कोटी २ हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता पहिले ते इयत्ता दहवीच्या विर्थ्यांना बेस्ट प्रवासासाठी तब्बल सव्वाचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ६ किलो हरभरा, ६ किलो मसूर डाळ, १०० ग्रॅम तांदूळ ऐवढा शिदा विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

“तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराने आरोग्य अधिकाऱ्याला केली शिवीगाळ

News Desk

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान !

News Desk