HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत दोन गटात तुफान हाणामारी; संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल

बीड | परळी येथे काल रात्री दोन राजकीय गटांत तुफान हाणामारी ची घटना समोर आली आहे. ही घटना काल (२ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. सदरील घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले असून, संभाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात देखील आला आहे. नगर पालिका निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असतांना कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपार रोडवर दोन राजकीय गटांत भांडण झाली. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक देशमुख व माजी नगरसेवक कराळे यांच्यात ही भांडणे झाली. धनंजय बालासाहेब कराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहेशनाना कराळे, धनंजय कराळे व ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे तर पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक मंठाले हे घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही | मराठा क्रांती मोर्चा

News Desk

मी रिलायन्सनचं टेंडर रिजेक्ट केलं अन्…; गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Aprna

अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन नारायण राणेंची टीका

News Desk