मुंबई | राज्यात तर कोरोनाबाधितांचा आखडा वाढतोच आहे. पण सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईमध्ये जर एखाद्या बिल्डिंगमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला तर पुर्ण बिल्डिंग सील केली जात होती. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेने नियमांमध्ये बदल केला आहे. जर एखाद्या बिल्डिंगमध्ये कोरोना रुग्ण आढळला तर फक्त ज्या माळ्यावर सापडला आहे तो माळा सील करणार. तसेच, जर पॉझिटिव्ह रुग्णाला कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे नसतील तर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व नियमांचे पालन करत पॉझिटिव्ह रुग्णाने आणि त्यांच्या सपर्कात आलेल्या लोकांनी राहायचे आहे. महानगरपालिका सर्व नियम हे सोसायटीच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगतील.
कोणते नियम पाळणे गरजेचे ?
- मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे.
- घरकाम करणाऱ्या व्यक्ती, अथवा सेल्समन यांना प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.
- जवळील किराण्याचे दुकान, मेडिकल अशा दुकांनासोबत बातचीत करुन अत्यावश्यक सेवा बिल्डिंगमध्ये पुरवण्याचा सल्ला पालिकेकडून सोसायटीच्या व्यक्तींना देण्यात आला आहे.
- आरोग्य खात्यात काम करणाऱ्या व्यक्तींनी इतर रहिवाशांना सॅनिटाझेशन करण्यास सांगावे.
- पालिकेचा आरोग्य विभाग क्वॉरंटाईन केलेल्या लोकांच्या संपर्कात असणार.
- क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींना सर्व अत्यावश्यक सेवा देण्यात याव्या.
- कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास पालिकेला १०८ किंवा १९१६ या क्रमांकावर संपर्क करा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.