मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या थोड्याफार प्रमाणात का होईना पण आटोक्यात आली आहे. मात्र, सध्या जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्याकडून दुप्पट बिल आकारले जात असल्याचे समोर आले होते. आता या रुग्णालयांना मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. नेमकी काय केले पालिकेने पाहुयात…
१- तक्रारदार रुग्णांना तब्बल १ कोटी ४७ लाखांची रुग्णालयाकडून परतफेड करण्यात आली.
२- दामदुप्पट बिल आकरण्याबाबत तक्रारींचा छडा लावण्यासाठी लेखापरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती.
३- एकूण १,११५ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ६२५ तक्रारी या ३७ रुग्णालयांतील होत्या.
४- या सर्व प्रकरणातील मूळ रक्कम १४ कोटी १ लाख इतकी होती. तक्रारींची पडताळणी केल्यावर देयकांची रक्कम १२ कोटीन५४ लाख इतकी झाली.
५- राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महानगपालिकेने काही खासगी रुग्णालयांमधील ८०% खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी दामदुप्पट बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना मुंबई महानगरपालिकेचा दणका!@mybmc cracks down on private hospitals for over-charging COVID-19 patients. pic.twitter.com/q4EYC5fmd5
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 21, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.