HW News Marathi
Covid-19

मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने तयार केला डॅशबोर्ड

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले २ महिने लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे आर्थिक फटका देखील राज्याला मोठ्या प्रमाणात बसला. मात्र, या सगळ्यातून मार्ग काढत राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत कालपासून (५ जून) दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. या धोरणानुसार मुंबई अनलॉक होईल. मात्र, येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी व्यक्त केला आहे.

येणाऱ्या काळातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केले आहेत. या डॅशबोर्डवर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळणार आहे आणि सोमवारपासून हा डॅशबोर्ड कार्यान्वित होईल अशी माहिती काकणी यांनी दिली आहे.

या आधीच महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी रुग्णालयातून इतर आजाराच्या रुग्णांना जसा डिस्चार्ज दिला जातोय तसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी जादा बिलाची आकारणी केल्यास नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार करावी, असेही यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम १४४ लागू; अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Aprna

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या १४ हजार ५४१ वर

News Desk

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भेटेल, पण मंत्री भेटत नाहीत ! सदाभाऊ खोत

News Desk