HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट समुद्रात उलटली, ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश

मुंबई | मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट अलिबागजवळच्या समुद्रात उलटल्याची दुर्दैवी घटना आज (१४ मार्च) घडली. यावेळी बोटीत ८८ प्रवासी होते, मात्र सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका झाल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. अलिबागजवळ बोट खडकावर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर बोट एका दिशेने कलंडली होती. मात्र मांडवा पोलिस कर्मचारी प्रशांत घरत आणि ‘सद्गुरु कृपा’ बोटीचे दोन खलाशी बचावकार्याला तात्काळ आले. या घटनेत ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, या आधी अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटला दीड वर्षांपूर्वी अपघात झाला होता. ही बोटही खडकावर आदळून बुडाली होती. बोटीवर असलेल्या २५ जणांपैकी २४ जणांना वाचवण्यात यश आले होते.

 

 

Related posts

कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे – प्रकाश आंबेडकर

News Desk

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk

मुंबई मेट्रोचा मासिक पास महागला

News Desk