HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे रद्द करण्यात आला आहे. तसे परिपत्रकही काढले आहे. गेले अनेक दिवस कोरोनाबाधित आणि संशयितांच्या वाढत्या संख्येकडे आमचे लक्ष होते आणि सभा किंवा मेळावे म्हटले की लोक जमो होतात, गर्दी होते. परंतु कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आल्याचे या परिपत्रकात लिहिले आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत त्याच पार्श्वभूमीवरही सभा, मेळावे होतील. पण यावेळीही होणारी गर्दी टाळावी यासाठी या निवडूकाही किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणी यावेळी या पत्रकातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार!  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

अर्ध्या तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

पद्मावत सिनेमाला मनसेकडून पाठिंबा असल्याची अफवा

News Desk