HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई हायकोर्टचा नकार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. जामीनासाठी छगन भुजबळ यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. बे हिशोबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी याचिकाकर्त्यांना दुसऱ्या बेंचसमोर जाण्याचे निर्देश दिले आहेत.

पीएमएलए कोर्टाने भुजबळांचा दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाला छगन भुजबळ यांच्याकडून हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. पण, जामीनावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने दुसऱ्या बेंचसमोर जाण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर हे दोघे जण मार्च २०१६ पासून कैदेत आहेत. तेव्हा देखील मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना मेसेजकरून केली तब्येतीची विचारपूस

Aprna

मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार,उद्धव ठाकरेंचं आश्वासन !

News Desk

राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे

News Desk