मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परदेशातून आलेल्यांना जर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तरीही या नियमांचे उल्लंघन करत या व्यक्ती घराबाहेर पडत आहेत त्यामूळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. त्यामूळे होम क्वॉरंटाईनचा सल्ला दिलेल्या व्यक्तींवर तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी आयआयटी बॉम्बेने SAFE या ॲपची निर्मिती केली आहे. त्याबद्दल ट्विट करत त्यांनी माहितीही दिली आहे.
A team led by Prof. Bhaskaran Raman and Prof. Kameswari Chebrolu of the Dept of CSE, IIT Bombay has developed the SAFE app, which can potentially be used by officials for checking quarantine adherence. Outline:https://t.co/Jr5ldisOHn
Direct link: https://t.co/5CHdpPJz8K— IIT Bombay (@iitbombay) March 29, 2020
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक बाधित रुग्ण त्यांना क्वॉरन्टाईन केलेले असतानाही नियमांचा भंग करून इतरांचे जीव धोक्यात घालण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या जीवाला यामुळे धोका आहे. मात्र, यामुळे इतरांना संसर्ग होऊन हा आजार पसरण्याची शक्यता टाळता येईल. संबंधित रुग्णाच्या हालचाली लक्षात घेऊन यंत्रणेला मुनष्यबळाचा वापर करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
हे ॲप क्वॉरन्टाईन करण्यास सांगितलेल्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मोबाईलवर अधिकृत यंत्रणेद्वारे इनस्टॉल करून घेता येणार आहे. हे ॲप इनस्टॉल केल्यानंतर यामध्ये वेळोवेळी जीपीएस सूचना येतील. संबंधित क्वॉरन्टाईन व्यक्तीने नियोजित परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्या तर त्याचा अलर्ट तात्काळ प्रशासनाला मिळणार असून त्याला बाहेर समाजात जाण्यापासून वेळीच रोखता येण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.