HW News Marathi
महाराष्ट्र

दोन्ही राजे भिडले, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

सातारा- साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांचे समर्थक रात्री एकच्या सुमारास भिडले. उदयनराजे यांनी आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवेंद्रराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आणेवाडी येथील टोलनाक्यावरून हा जबरदस्त राडा झाल्याचीही माहिती समोर येते आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले,दोघांची निवासस्थाने असलेल्या परिसरात कारच्या काचाही फोडण्यात आल्या.

आणेवाडीचा टोलनाका मागील १२ वर्षांपासून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होता. मात्र रिलायन्स कंपनीने हा टोलनाका त्यांच्याकडून काढून घेतला. त्यानंतर रिलायन्स कंपनीने हा टोलनाका शिवेंद्रराजेंच्या समर्थकांना दिला. बाळासाहेब खंदारे यांच्या ताब्यात हा टोलनाका सध्या आहे. खंदारे हे आमदार शिवेंद्रराजेंचे समर्थक आहेत. या निर्णयामुळे उदयनराजेंचा चांगलाच संताप झाला.तसेच रात्री झालेला वाद या टोलनाक्यावरूनच निर्माण झाला, ज्याचे रूपांतर राड्यामध्ये झाले. टोलनाक्यावर काम करणाऱ्या कामगारांचे काय होणार? हा प्रश्न पुढे करत उदयनराजे भोसले गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. शिवेंद्रसिंह आणेवाडी टोलनाक्यावर जाणार होते, मात्र ते गेलेच नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अमरावती हिंसाचार षडयंत्राचा भाग होता का ?,” मलिकांचा भाजपवर आरोप

News Desk

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, सेनेचा खोचक सल्ला 

News Desk

इच्छुकांना पक्षात परत घेण्यात कोणतीही अडचण नाही, अनेकजण संपर्कात !

News Desk