HW News Marathi
देश / विदेश

‘मेडल मोदीजींनी आणलंय का?’ ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सरने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच करण्याऱ्या विजेत्यांचा सत्कार काल(९ ऑगस्ट) दिल्लीत करण्यात आला. नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेलं बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

पदक विजेत्यांचं काल(९ ऑगस्ट) दिल्लीत सत्कार करण्यात आला. येवेळी पाठी लावलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो होते. मात्र हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या आकारापेक्षा फारच छोटे असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.

भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील

विजेंद्र सिंगने याआधी देखील पंतप्रधानांवर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता तेव्हाही विजेंदरने मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विटरवरुन लगावला होता.

बी.व्ही. श्रीनिवास यांनीही केली टीका

नरेंद्र मोदींच्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि आता ते चर्चेचं कारण बनलं आहे. बी. व्ही. यांनी अन्य एका ट्विटमध्ये “खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत.. न पहले कभी देखी है न सुनी है..”, अशा ओळींसहीत या कार्यक्रमामधील मंचाचा फोटो शेअर केलाय ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरुनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेने लहान आकाराचे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

News Desk

भ्रष्ट दाभोलकरांच्या नावे शास्त्रज्ञाला पुरस्कार, विचित्र विरोधाभास | हिंदू जनजागृती समिती

Gauri Tilekar

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk