HW News Marathi
देश / विदेश

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

मुंबई । पेट्रोल-डिझेलसंदर्भातील महत्त्वाची बातमी! इंधनाच्या दरवाढीमुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागलेली असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. खनिज तेलाची प्रतिबॅरल किंमत आता ८६ डॉलर्सवरून ८५ डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. रॉयटर्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, इंधनासह कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या दरातही घसरण झाली आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात जरी इंधनाच्या दरांसदर्भात ही सकारात्मक बातमी असली तरीही भारतात मात्र इंधन दर चढेच आहेत. त्यामुळे, देशातील जनतेला दिलासा कधी मिळणार याची अपेक्षा आहे.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून आज म्हणजेच शनिवारी (२३ ऑक्टोबर) सलग चौथ्या दिवशी इंधनदरात वाढ करण्यात आली. यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ३० ते ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलची प्रतिलीटर किंमत ११३.०८ रुपये, तर डिझेलची प्रतिलीटर किंमत १०३.९७ रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत दर अनुक्रमे १०७.२४ आणि ९५.९८ रुपये इतकी आहे.

दररोज सकाळी जाहीर होतात इंधन नवे दर

तुमच्या माहितीसाठी, दर दिवशी सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश केल्यानंतर त्याचे दर जवळपास दुप्पट होतात. हे दर दिवसभरासाठी लागू असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार विमाने खरेदी करू शकतात मात्र शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत –  प्रियंका गांधी

News Desk

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित न करता आल्याचा दोष ‘काँग्रेस’वर

News Desk

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी ९ ऑगस्टला निवडणूक

swarit