मुंबई| मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मुंबईच्या बीकेसी परिसरात आज पहाटे उड्डाणपूल कोसळला आहे. खरतरं हा पूल निर्माण करण्याचे काम सुरू होते.उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर उपस्थित होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली.जी माहिती आहे त्यानुसार पूल कोसळल्यामुळे १३ जण जखमी झाले आहेत.त्यांना जवळच्या हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलय.
#WATCH | Nine people sustained minor injuries & were taken to a nearby hospital after a portion of an under-construction flyover collapsed in Mumbai's Bandra Kurla Complex at around 4:40 am today, as per a fire brigade official present at the spot
(Latest visuals from the spot) pic.twitter.com/Ddrzw0uzT5
— ANI (@ANI) September 17, 2021
आज पहाटे ४.३० च्या सुमारास अपघात झाला त्यावेळेस या पूलावर तब्बल २० ते २५ मजूर काम करत होते. पहाटेच्या वेळी काम सुरू असताना या पूलाचा एक गर्डर निखळून खाली पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्वजण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तुर्तास तरी कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. हा उड्डाणपूल कसा पडला, याचे कारणही अद्याप समजलेले नाही. मात्र, यावरुन आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.