मुंबई | देशभरात अनलॉक आणि महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ हळूहळू सर्व सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन’मध्ये मुंबई महापालिकेने आज (९ जून) दुकानांशी संबंधित सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, सर्व मंडया, मंडयांचे परिसर आणि दुकाने सोमवारी ते शनिवार पूर्णवेळ सुरू राहतील.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) issues amendments to the circular of extension of lockdown and revised guidelines on the measures to be taken in respect to easing of restrictions and phase-wise opening of lockdown. #Mumbai pic.twitter.com/zZuzdk6Zrh
— ANI (@ANI) June 9, 2020
दम्यान, राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर रात्री आठ नंतर असलेली संचारबंदी लागू आहे. हे लक्षात घेता दुकानातील कर्मचारी घरी वेळेत पोहोचावेत. यासाठी दुकाने पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. सम आणि विषम नियम पाळून मोजकीच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. ही अट अजूनही लागू ठेवण्यात आली आहे. मुंबईमधील मॉल, व्यापारी संकुले ही मात्र अजूनही बंदच राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.