HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली २० जणांना बाहेर काढले तर १० जणांचा मृत्यू

भिवंडी | भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. काल (२० सप्टेंबर)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

Related posts

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

News Desk

महाविकासआघाडीतील नाराज काँग्रेस नेते लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार

News Desk

साताऱ्यात ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ३२ जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

News Desk