HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास

बुलढाणा | येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, असा ठाम विश्वास बुलढाणा विधानसभा मतदार संघातील आमदार शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शेतकऱ्यांशी संबंधिती असलेली धोरणे सारखीच असल्यामुळे आम्ही एकत्र देऊ, असा दावा देखील गायकवाड यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

“राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची विचारधार ही वेळी असून ते एकत्र कसे येतील,” अशा चर्चा सध्या राजकारणात रंगल्या आहेत. मात्र, “भाजपचे महबूबा मुफ्तीसारख्या देशद्रोहाच्या विचारांशी त्यांचे धोरणांसोबत जर जुळू शकते,” तर मग आमचे राष्ट्रवादी सहज जुळेत शकते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठी असलेले धोरणे सारखीच असल्याचे गायकवाड यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो सांगतील तोच आमचा मुख्यमंत्रीअसेल, असा विश्वास देखील गायकवाड यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा करायचे हे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तरुणांना बेरोजगारीतून बाहेर काढण्याचा चांगले घेण्यासाठी राज्याला चांगले सरकार देऊ, ज्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, तेव्हा शेतकऱ्यांचा सात बारा कोराझालेला असेल हे तुम्हाला दिसेल असा दावा देखील गायकवाड एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk

पंकजा मुंडेंच्या टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

News Desk

जिल्हा वार्षिक योजनेतून किमान पाच टक्के निधी देण्यास मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये अधिक सुविधा देणे शक्य होईल! – वर्षा गायकवाड

Aprna