HW News Marathi
महाराष्ट्र

बुलढाण्यात मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जण कोरोना पॉझिटिव्ह

बुलढाणा | बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (२८ मार्च) सकाळी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. बुलढाणा मृत पावलेल्या या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील २ जणांचे रिपोर्ट देखील कोरोना पोजिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी (३० मार्च) या कुटुंबातील व त्याच्या संपर्कातील ६० जणांना आइसोलेट वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील ३४ जणांचे स्वॅब सॅम्पल नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यांपैकी २० जणांचे रिपोर्ट्स कोरोना निगेटिव्ह आले असून उर्वरित १२ मधील जे २ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बुलढाण्यात अत्यंत चिंतेचे वातावरण आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

Sanjay Jog

FDA कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली, परिमल सिंह नवे आयुक्त

News Desk

शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट, केशव उपाध्येंची

swarit