HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईमध्ये बुलेट ट्रेन होऊ देणार नाही- राज ठाकरे

मुंबईकरांनी मुलभूत सुविधा मिळण्याची बोबं असताना बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असून मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. मोदींना बुलेट ट्रेन हवी असेल तर त्यांनी गुजरातमध्ये सुरू करावी. लोकांना नेमके काय हवे, याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला आहे. दरम्यान रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी येत्या पाच तारखेला चर्चगेट रेल्वे प्रशासनाल जाब विचारण्यासाठी भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही राज यांनी या वेळी दिला.

परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी होवून २२ जणांचा बळी गेला तर ३५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज यांनी संताप व्यक्त केला. मुंबईत दाखल होणार परप्रांतीयांचे लोंढ येथील संमस्या असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी योगा, स्वच्छता मोहिमेत अडकवले जात आहे. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी शास्रज्ञ अनिल काकोडकर यांनी अहवाल सादर केला होता. रेल्वे पुलाच्या दुरूस्तीसाठी पाच वर्षात एक लाख कोटी रुपये म्हणजे वर्षाला २० हजार कोटी रुपये लागणार होते. तर अवघ्या सहाशे कोटीत बुलेट ट्रेन आणण्याचा अहवाल गेल्या सरकारने तयार केला होता. परंतु या सरकारने तो बासनात ठेवला.

सरकार बदलले. काही बदलले नाही. केवळ नोटांचे रंग बदलले. दिवसेंदिवस शहर बरबाद होणारच. असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष. घालायला चड्डी नाही, आणि सुट खरेदीचा घाट घातला जात आहे. सर्वत्र निराशजनक वातावरण आहे. आपल्या देशात आंतकवादी हवेत कशाला आपलेच माणसे आहेत. आपल्या देशाला दुश्मनाची गरज नाही. कशाला हवे पाकिस्तान, चीन. रोज किती माणसे रेल्वेत मरतात. दसऱ्याच खरेदी असेल काय सांगून बाहेर पडले असतील ती माणसे. सांगूनही आमच्या सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

स्टेशनचे नाव बदलून काय होणार. कीड्या मुंग्यासारखे माणसं मरतात, परिस्थिती सुधारत नाही. नुसते सरकार बदलतात. मी येत्या पाच तारखेला मोर्चा काढणार, रेल्वे प्रशासनाला जाब विचारणार आहे. रेल्वेसाठी काय आवश्यक आहे. याची माहीती मागवणार आहे. चर्चेगेट स्टेशनला जावून भेट देणार. हा विषय गर्दीचा नाही, राग व्यक्त करण्याचा आहे. मुंबईकरांनी त्यांचा राग व्यक्त करावा, त्यांनी यात हजेरी लावावी. मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. अजिबात होणार नाही, मोदींनी जर करायची असेल तर त्यांनी गुजरातमध्ये केली जाईल. लोकांना नेमके काय हवे, त्यांनी समजून घ्यावे. लोकांना दिवसा कसे जगावे, याचा प्रश्न असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. कशाला हवी बुलेट. अनधिकृत गोष्टी वाढतायत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही. किती माणसं हे शहर सहन करणार. काल जे पुलाचे झाले आहे, ते हे शहराचे झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही नितेश राणे यांची टीका!

News Desk

‘भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण’, संजय राऊतांची टीका!

News Desk

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील

News Desk