HW News Marathi
महाराष्ट्र

बैलगाडी नदीत पडून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू 

जळगाव – किटकनाशक फवारणीसाठी पाणी आणण्यास गेलेल्या शेतक-याची बैलगाडी पूर्णा नदीच्या डोहात पडून त्यांच्यासहीत दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे. संजय सदाशिव कारगुडे (27) असे मृत शेतक-याचे नाव आहे. संजय हे मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावातील रहिवासी होते. सोमवारी सकाळी हा अपघात घडला.

वाचा;धावत्या ट्रेनमध्ये चोरट्याने बॅग खेचल्याने महिला ट्रेनखाली पडून महिलेचा मृत्यू

दरम्यान, या अपघातातून त्यांचा चुलत भाऊ सुखरुप बचावला आहे. संजय कारगुडे चुलत भाऊ नितीन कारगुडे (18 वर्ष) याच्यासह बैलगाडीवरुन पाण्याचा बॅरल घेऊन पूर्णा नदीत पाणी आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान बैलगाडी पाण्याच्या डोहात पडली आणि डोहात बुडून संजय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, संजय यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

News Desk

राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा, तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे !

News Desk

‘म्हणूनच मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, आदित्य शिरोडकरांनी सांगितलं कारण

News Desk