HW News Marathi
देश / विदेश

BYJU कडून नीरज चोप्राला 2 कोटींची भेट!

मुंबई। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राला BYJU ने २ कोटींचं बक्षीस दिलं आहे. BYJU ने गोल्ड मेडल पटकावणाऱ्या नीरज चोप्राला २ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केलीये. त्याचबरोबर टोकिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंला प्रत्येकी १ कोटी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ मेडल मिळाले आहेत.

खेळाडूंना BYJU कडून भेट

भारताच्या खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमालीची कामगिरी बजावली आहे. भविष्यात देशातून अनेक खेळाडू घडावेत आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी BYJU ने पुढाकार घेतलाय. कंपनीने नीरज चोप्राला २ कोटींचे बक्षीस जाहीर केलंय. तसेच मिराबाई चानू, रवी कुमार दहीया, लवलिना बोर्गोहेन, पीव्ही सिंधू आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येक १ कोटी रुपये मिळणार आहेत.

कोरोना काळातही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. ते सर्व भारतीयांसाठी प्रेरणा ठरले आहेत. भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी खेळाडूंनी केली असून भविष्यात भारत ऑलिम्पिकमध्ये अधिक मेडल जिंकेल हे त्यांच्या कामगिरीमुळे सिद्ध झालंय, असं कंपनीचे संस्थापक आणि सीईओ बायजू रविंद्रन म्हणाले आहेत.

देशाच्या जडणघडणीत खेळ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपल्या खेळाडूंचा विजय आपण साजरा करायला हवा. पण, हे सेलिब्रेशन केवळ चार वर्षातून एकदा नाही, तर दररोज व्हायला हवं. त्यांची मेहनत, त्याग आणि कामगिरीसाठी त्यांना बक्षीस जाहीर केलं जात आहे. पुढील लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना ही छोटीशी रक्कम कामाला येईल अशी आशा आहे. भारतात खूप क्षमता आहे. खेळ प्रिय देश म्हणून ओळख असलेला भारत खेळणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जावा, अशी आशा बायजू रविंद्रन यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले 

News Desk

गुलाम नबी आझाद यांच्या कार्याला उजाळा देत शरद पवारांनी सांगितला एक किस्सा

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

News Desk