मुंबई | देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. ह्या लॉकडाउनच सर्वाधिक फटका देशभरातील स्थलांतरित मजुरांना बसला आहे. तब्बल २ महिने आपल्या घरापासून लांब, हलाखीच्या स्थितीत अडकून पडल्यानंतर केंद्राने या स्थलांतरित मजुरांना घरी जाण्यास परवानगी दिली खरी मात्र तरीही त्यांचे हाल काही थांबले नाहीत. अनेक जण अजूनही देशभरात विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर मोठ्या संख्येने लोक आपल्या घराच्या ओढीने पायीच निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्या कामाचे आता प्रचंड कौतुक होत आहे. अभिनेते सोनू सूद यांनी स्वतः अशा अडकून पडलेल्या जास्तीत जास्त स्थलांतरित मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठ्वण्यासाठी बसेसची सोय केली आहे. त्यामुळे आता देशभरातून त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी देखील ट्विट करून अभिनेते सोनू सूद यांचे कौतुक केले आहे.
Sonu Sood is arranging buses for migrants who want to go back to their homes. He is trying to help as many migrants as he can. The on screen villain is an inspiring hero in reality!
God bless him ❤️@SonuSood #SonuSood pic.twitter.com/cokoowzjhU— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 23, 2020
“ज्या स्थलांतरी मजुरांना आपल्या घरी जायचे आहे अशा मजुरांसाठी अभिनेते सोनू सूद बसची व्यवस्था करत आहेत. शक्य असेल तितक्या जास्तीत जास्त लोकांना आपल्या घरी पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ऑनस्क्रीन ‘व्हिलन’ची भूमिका साकारणारे ते त्यांच्या या कृतीने प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ‘हिरो’ ठरले आहेत”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अभिनेते सोनू सूद यांचे कौतुक होत आहे. हवालदिल झालेल्या स्थलांतरित मजुरांसाठी धावून जाण्याच्या त्यांच्या कृतीने निश्चितच अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. देशभरात सध्या स्थलांतरित मजुरांची बिकट झालेली स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. गेल्या २ महिन्यांपासून कामाविना, उत्पन्नाविना, आपल्या घरापासून लांब शहरात पुरेशी सुविधा मिळत नसतानाही राहणे हे आता त्यांच्यासाठी असह्य झाल्याने त्यांनी पायीच जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.