HW News Marathi
महाराष्ट्र

प्रबोधनकारांच्या ग्रंथ प्रकाशनाला राज ठाकरेंनाही बोलवा! आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथाच्या प्रकाशनावरून नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. कारण, आता भाजपने ह्यात उडी घेतली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “या कार्यक्रमाला प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणाऱ्या राज ठाकरे यांना देखील आमंत्रण देऊन एक चांगला संदेश देता आला असता”, असं आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्याचसोबत, “विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाला बोलावलं असतं तर अधिक आनंद झाला असता”, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “मी ज्या ज्या वेळी राज ठाकरेंना भेटतो त्या त्या वेळी प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार त्यांच्या तोंडून ऐकतो. त्यामुळे, राज यांना आताही या कार्यक्रमाचं निमंत्रण देता येईल. राज ठाकरे जर या व्यासपीठावर आले तर एक अत्यंत संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत, विरोधी पक्षनेत्यांच्या आमंत्रणाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी, ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथाबद्दल शेलारांनी सरकारचं अभिनंदनही केलं आहे.

‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ ग्रंथाचं उद्या लोकार्पण

‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथाचं प्रकाशन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण उद्या म्हणजेच १६ ऑक्टोबरला होत असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.याच कार्यक्रमाच्या, आमंत्रणावरून आशिष शेलारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शेलार यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

DBT पद्धतीने बांधकाम कामगारांच्या बॅंकेत प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार

News Desk

‘मसाला किंग’ MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन

News Desk