HW News Marathi
महाराष्ट्र

कसाबने लपवलेला शस्त्रसाठा शोधून काढणारा ‘कॅनिंग सैनिक’ कालवश

पालघर | मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्रीचा दहशतवादी हल्ला संपूर्ण देश आणि मुंबईकर कधीही विसरु शकत नाहीत. या हल्ल्यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी मारली. अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या हल्ल्यावेळी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या एका श्वानाचं निधन झालं आहे. या श्वानाचं नाव नॉटी असं आहे. त्याने काल (१० मे) अखेरचा श्वास घेतला असून तो 14 वर्षांचा होता.

पालघरमधील सफाळे येथील माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा 2014 मध्ये सेवा निवृत्त झाला होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब याने लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानाने शोधून काढला होता. नॉटी अचानक आजारी पडला. त्याचं वय 14 वर्ष इतकं पूर्ण झालं होतं. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटीने शौर्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस..!

News Desk

“आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा, नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

News Desk

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

News Desk