HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

कामशेत | पिंपळोली गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (१४डिसेंबर) रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास कारने टँकरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कुणाल मयुरेश्वर राजे (वय २३) हा पिंपरी येथील महेशनगर येथील रहिवासी आहे.

कुणाल हे एमएच-१४. ईयु ४००२ या क्रमांकाच्या कार मधून मुंबईवरून पुण्याकडे येत असताना पिंपळोली गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून चाललेल्या गॅस टँकर एपी-३१.टीई. ६९५९ ला पाठीमागून कारने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पाटील हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली, राऊतांचा खळबळजनक दावा

News Desk

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk

मेट्रो कारशेडच्या न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk
राजकारण

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे “जीवन बचाओ आंदोलन”

News Desk

मुंबई | मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या जवळपास ३०,००० लोकांना माहुलमधील म्हाडा कॉलनीमध्ये शासनाने पुनर्वासित केले आहे. माहुलमधील या वसाहतीभोवती १६ रासायनिक कारखाने असल्यामुळे येथील हवा अत्यंत प्रदूषित आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज महूलवासीयांनी कर्णक बंदर ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढला आहे.

गेल्या दीड वर्षांत हवेच्या प्रदूषणामुळे या भागातील १०० पेक्षा जास्त माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. तर शेकडो लोकांना वायू प्रदूषणामुळे अनेक आजार झाले आहेत. माहुल येथील म्हाडा कॉलनी मानवी वस्तीस योग्य नाही असा अहवाल राष्ट्रीय हरित लवाद (NGT), के.ई.एम रुगणालय, आयआयटी मुंबई या संस्थांनी दिला आहे. याच अहवाला आधारे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य शासनाला माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे मुंबईत इतरत्र सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र शासन मात्र अजूनही कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला तयार नाही. माहितीच्या अधिकारातून काढलेल्या माहितीनुसार मुंबईत विविध ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली ७०,००० घरे रिकामी असूनसुद्धा शासनाने त्यांच्याकडे घरे उपलब्ध नाहीत, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले आहे. महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे मुंबईत योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे म्हणून या प्रकल्पग्रस्तांनी २८ ऑक्टोबर २०१८ पासून माहुलमधील आपले घर सोडून विद्याविहार येथील फुटपाथवर राहून “जीवन बचाओ आंदोलन” सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर करत आहेत.

आज आंदोलनाचा ४९ वा दिवस आहे. गेल्या एका महिन्यात अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, दरवेळेस त्यांनी ही भेट रद्द केली. आज आंदोलनाचा ४९ दिवस असूनसुद्धा मुख्यमंत्री या लोकांसाठी १ तासाचा वेळ काढू शकत नाहीत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

विद्याविहार येथे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. तेथून केवळ ५ मिनिटांच्या अंतरावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री मा. प्रकाश मेहता यांचे घर आहे. परंतु आंदोलन सुरू झाल्यापासून ते एकदाही आंदोलनकर्त्यांना येऊन भेटले नाहीत. विद्याविहार येथे ४९ दिवस फूटपाथवर राहून धरणे आंदोलन केल्यानंतरसुद्धा शासनाने माहुलवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही पाहुल उचलले नाही म्हणून आज महूलवासीयांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे

Related posts

भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी; राहुल गांधी पहिल्यांदा जॅकेटमध्ये

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

मी शिवसेना सोडली कारण….!

News Desk