HW News Marathi
देश / विदेश राजकारण

भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी; राहुल गांधी पहिल्यांदा जॅकेटमध्ये

मुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा ही आता काश्मीरमध्ये पोहोचली आहे. या यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (20 जानेवारी) सहभागी झाले आहेत. ही यात्रा आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथून सुरू झाली आहे. यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे थंडीपासून वाचण्यासाठी राहुल गांधींनी राहुल गांधी यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातले दिसून आहे. कारण भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधींनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. राहुल गांधींच्या या वेशभूषेचे कौतुक झाले तसेच भाजपने त्यांच्यावर टीका देखील केली होती.

भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, “देशासाठी गांधी परिवाराने बलिदान दिले आहे. याच परिवारातून आलेल्या एक तरुण देशाच्या एकता आणि द्वेष-सूडभावना संपण्यासाठी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत चार हजार किमी चालत निघाला आहे. या यात्रेला देशातील जनतेने पाठिंबा दिला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणे हे भारताच्या प्रत्येक कर्तव्य आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारत जोडो यात्रेचा शेवटाच टप्पा आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मी काश्मीरला आलो आहे”

राहुल गांधी हे दिल्लीच्या सात डिग्री अंश सेल्सियसमध्ये असताना सुद्धा भारत जोडो यात्रेत त्यांनी टी-शर्टवर ते चालत होते. यात्रा सुरुवातीच्या वेळी राहुल गांधी यांच्या याच पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधी यांचा हा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट बरबरी ब्रँडचा असून यांची किंमत 40 हजार आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना सोशल मीडियावर ट्रोल केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत ही सगळी निवडणुकीची जुमलेबाजी सुरूच राहील !

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

शरद पवार तुमच्यासारखा नेता पाकिस्तानचे कौतुक करतो ?

News Desk