HW News Marathi
देश / विदेश

#SushantSinghRajput | CBI कडून ६ आरोपींसह अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने आज (६ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. बिहार सरकारच्या विनंतीनुसार आणि भारत सरकारच्या पुढील अधिसूचनेवर या प्रकरणाचा तपास आता CBI कडे असणार आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी २ जुलै २०२० रोजी पाटणा येथील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयकडून ६ आरोपींसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी मागणी बिहार सरकारने केली होती. त्यानुसार, बुधवारी (५ ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली. मात्र, आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी CBIकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शॉव्हिक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह अन्य काही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी या प्रकरणी २५ जुलै २०२० रोजी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केली होती. रिया चक्रबर्ती हिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोही यावेळी त्यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

swarit

मराठा आरक्षणाबाबत वेळकाढू धोरण नको ! संभाजीराजेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk