HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajput : सीबीआय टीम मुंबईत दाखल झाल्या झाल्या अँक्शन मोडमध्ये

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय टीम तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमके अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय शहानिशा करणार आहे. सीबीआयची टीम आज (२१ ऑगस्ट) सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती सीबीआयच्या ताब्यात आहे. शौविकला सीबीआयच्या गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर कुक नीरज यालाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले. सुशांतची डायरी, मोबाइल, लॅपटॉप मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता सीबीआयने ताब्यात घेतलेला हा तपास कोणत्या देशेने जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटत नाही!

News Desk

नवनीत राणानी न्यायालयाने घातलेल्या अटीचे उल्लंघन,  सरकारी वकील न्यायालयात जाणार?

Aprna

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचं कोरोनामुळे निधन …

News Desk