HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajput :सीबीआय पथक मुंबईत दाखल, मुंबई पोलिसांसोबत होणार आज बैठक

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा पुढील तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. आणि त्याच तपासासाठी काल (२० ऑगस्ट) सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, आजपासून त्यांच्या तपासाला सुरुवात होणार असून आज (२१ ऑगस्ट) मुंबई पोलिस आणि सीबीआय पथकाची बैठक होणार आहे.

सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. ५ टीम बनवून एसआयटी आजपासून मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे. सीबीआयने आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्विस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि एडिशनल एसपी अनिल यादव यांचा समावेश आहे. या प्रकरणातली केस डायरी, क्राईम सीनवरचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट आणि आत्तापर्यंत घेतलेल्या जबानींची प्रत या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांना या टीमला सादर कराव्या लागणार आहेत. सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे.

 

गेल्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंन्टाईन केले होते. आता मात्र सीबीआयची ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दाखल होत आहे. शिवाय तपासात महाराष्ट्र सरकारने पूर्ण सहकार्य करावे असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या टीमला महाराष्ट्रात कशा पद्धतीने वागणूक दिली जाते हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे. शिवाय जर हे पथक ७ दिवसांपेक्षा जास्त काळ थांबणार नसेल तर त्यांना क्वारंटाईन करणार नाही असेही आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी; शौचालयाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी शासन सर्व प्रकारची मदत करेल! – मुख्यमंत्री

Aprna

‘आरे’मधली ८१२ एकरची जागा वन विभागाच्या ताब्यात, मुंबईच्या मध्यभागी जंगल उभं राहणार!

News Desk

सावधान! स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंगच

News Desk