HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी CBI करणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश

मुंबई | बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी आता CBI कडे सोपवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने आज (१८ ऑगस्ट) हे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारने पूर्ण सहकार्य करावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच, सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी CBI ला द्यावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे CBI कडे सोपवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाटणाच नव्हे तर भविष्यात होणारे सर्व FIR देखील CBI तपास करणार आहे.

या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ, ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे!

News Desk

आपल्यापेक्षा ताकदवान लोकांशी लढा, लहान मुलांशी लढण्यात काय गंमत !

swarit

‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर

Aprna