HW News Marathi
महाराष्ट्र

सहकारी बॅंका वाचवण्यासाठी शरद पवारांचे मोदींच्या पत्र

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकारी बॅंक वाचवण्यासंबंधी पत्र लिहिले आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सहमत असतील असे पवार म्हणाले. तसेच, सहकारी बँकांनी देशात साक्षरता वाढवण्याची महत्त्वाची भूमिकाही साकारली असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “सहकारी बँकांचे सहकारपण कायम ठेवले पाहिजे. असे झाले तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसेच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील,” असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

“सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलणं हे समस्येचं निराकरण नाही,” असंही ते म्हणाले. सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आपण सहमत आहोत. परंतु सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असं म्हणणं चुकीचं ठरेल. २०१९ – २०२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दाखवत केला आहे. १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचे आवाहनही त्यांनी या पत्रातून केले आहे.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याचं सांगितलं होतं. शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर सहकारी बँकांना आर्थिक शिस्तीची गरज असल्याचंही म्हटलं. परंतु सरकारी बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेचा प्रभाव वाढत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराजांच्या पुतळ्याला उन्हात जाऊन अभिवादन करायला त्रास होतो का? अजित पवारांचा मुनगंटीवारांना खोचक टोला

Aprna

…आणि मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्यांवर ‘IT’ने धाडी घालायला सुरुवात केली

News Desk

कॉंग्रेस नेते शरद पवारांच्या दरबारी!

News Desk