HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत प्रकरणी सीबीआय पुढील तपासणीसाठी आज मुंबईत दाखल होणार

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सर्वोच्च न्यायालयाने काल (१९ ऑगस्ट) सीबीआयकडे सोपवला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयच्या ताब्यात द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील तपासासाठी सीबीआयची टीम आज (२० ऑगस्ट) मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सीबीआय घटनास्थळापासून, सुशांतच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करणार आहेत.

“या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले तर त्यांना क्वारंटाईन केले जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट देऊ”, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

5 ते 6 दिवसात शाळा कॉलेज संदर्भात निर्णय, आरोग्यमंत्र्यांची माहिती!

News Desk

आज पुन्हा भारत बंद

News Desk

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna