HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील वाहनांवरील कलर कोड सिस्टीमचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द

मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. या काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनाला एक खास कलर स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलं होतं. यासाठी मुंबई पोलिसांनी खास ३ रंगाचे स्टिकर सिस्टम सुरु केली होती. मात्र काहीच दिवसांत ही कलरकोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर काही ठराविक रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

काय आहे नवे ट्विट?

प्रिय मुंबईकरांनो.लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe. त्यामुळे आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

मुंबई पोलिसांकडून ३ कलर कोड

“राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी कलर कोड सुरु करत आहोत”, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली होती.

 

कलर कोड नेमका कशाप्रकारे होता?

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, डॉक्टर अशाप्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे १२ निलंबित आमदार पोहोचले सर्वोच्च न्यायालयाच्या दारी!

News Desk

मंत्रिमडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे १९ निर्णय

News Desk

प्रजासत्ताक दिनी सजली विठुरायाची पंढरी

News Desk