नवी दिल्ली | केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) इयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
सीबीएसईने काढलेल्या नव्या अधिसुचनेनुसार, इयत्ता ९ वी आणि ११वी मध्ये नापास विद्यार्थ्यांसाठी शाळांनी पुर्नपरिक्षा घ्यावी, असा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन अथवा शाळेत हजर राहून तसेच विद्यार्थ्यांनुसार या परिक्षा घेण्यात यावेत असे आदेश दिले आहे. ज्या विषयात विद्यार्थी नापास झाला आहे, यासंबंधित घेण्यात येणा-या पुर्नपरिक्षेपूर्वी संबंधित विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, याची खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
In view of the unprecedented circumstances of Covid-19, Union HRD Minister, @DrRPNishank has advised all CBSE schools to provide an opportunity to all students, who have failed in 9th and 11th to take online/offline tests.@OfficeOfSDhotre @DDNewslive @PTI_News
— CBSE HQ (@cbseindia29) May 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.