HW News Marathi
देश / विदेश

CBSE बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत टळली

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात आज (३१ मे) पुन्हा CBSE आणि CISCE द्वारे आयोजित १२वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. परंतु आज पुन्हा एकदा याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यावर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं की, सरकार येत्या काही दिवसात बारावी बोर्ड परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

CBSE बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी सध्या 3 जूनपर्यंत टळली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, आम्हाला गुरुवारपर्यंतची मुदत द्यावी. सरकार अंतिम निर्णय तेव्हाच सांगेल. दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु बारावी बोर्डाची परीक्षा केवळ स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देखील रद्द करावी आणि याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे.

अशात सुप्रीम कोर्टात बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर मागील आठवड्यात शुक्रवारी (28 मे) सुनावणी होणार होती, परंतु ती टळली. आज या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी झाली, जी पुन्हा एकदा टळली आहे. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, तुम्हा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या.” तर याचिकाकर्त्यांनी म्हटलं की, “मागील वर्षात अवलंबलेलं धोरण यंदाही अवलंबता येऊ शकतं.” “जर सरकार मागील वर्षाच्या आपल्या निर्णयापासून मागे हटत असेल तर त्यांनी ठोस कारण सांगावं,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. सरकारच्या निर्णयानंतर आम्ही याचा तपास करु, असंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एम. के. स्टॅलिन यांची डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड

swarit

सैन्य दलातील भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन

Aprna

भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली !

News Desk