HW News Marathi
Uncategorized देश / विदेश

सैन्य दलातील भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन

मुंबई | देशाच्या तिन्ही सैन्य दलात ‘अग्निपथ’ योजनेची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. यानंतर बिहार आणि राजस्थामध्ये अग्निपथ योजनेचा विरोधात मोठ्या संख्यने विद्यार्थ्यींनी रेल्वे स्थानकावर आंदोलन केले आहे. या बिहार मधील छपरा, आरा, जेहनाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.  या योजनेची घोषणा केल्यापासून आंदोलनादरम्यान ठिका ठिकाण रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखणून अडथळा निर्माण केले जात आहे. केंद्रानेला होणार विरोध पाहात अग्निपथ योजनेचा सरकारने पुन्हा विचार करा, अशी मागणी काँग्रेसने केले आहे.

या योजनेनुसार भारतीय लष्करात जवानांना चार वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. यातील फक्त 25 टक्के पुढील जवानांना 15 वर्षासाठी लष्करी सेवेत घेणार आहे. लष्करात चार वर्षपूर्ण केल्यानंतर ते जवानांपुढे काय करणार?, असे असा प्रश्न उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर देशभरातील ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत.

दरम्यान, विद्यार्थींनी बिहार येथील छपरा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावल्याची घटना घडली. जहानाबामध्ये लष्करात भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच हरियाणातील गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रस्ता रोको केला.

 

 

 

 

 

Related posts

एल व एन विभागातील नागरीकांनी पाणी उकळून प्यावे- पालिका

News Desk

भारत-पाक सीमेवर पहिल्यांदा शस्त्रपूजा

Gauri Tilekar

ठरलं! यूएईत होणार IPL २०२१चे उर्वरित सामने

News Desk