HW News Marathi
महाराष्ट्र

CBSE कडून १०वी-१२वीच्या वेळापत्रकात बदल

नवी दिल्ली | कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम असताना काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता CBSE बोर्डाने आपल्या वेळापत्रकात बदल केले आहेत. १०वी आणि १२वीच्या काही विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

परीक्षेची तारीख बदलली

CBSE बोर्डाअंतर्गत घेण्यात येणारी १२वीच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स विषयाची परीक्षा १३मे रोजी होणारी होती. मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा ८ जूनला होणार आहे. तसंच १२वीच्या गणित विषयाची १ जूनला होणारी परीक्षा ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे.

आणखी कोणत्या विषयांच्या परीक्षेत होणार बदल?

– १२वीच्या विद्यार्थ्यांची Web application ची परीक्षा ३ जून ऐवजी २ जूनला होणार, तर भूगोल विषयाची परीक्षा २ जून ऐवजी ३ जून रोजी होणार.

इथे पाहा बदललेलं वेळापत्रक

CBSE बोर्डाने बदललेलं वेळापत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलं आहे. १०वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा २१ मेच्या जागी २ जून रोजी होणार, तर Frenchची परीक्षा १३ मे रोजी होणारी परीक्षा आता १२ मे रोजी होणार, विज्ञात विषयाची परीक्षा १५ मे ऐवजी २१ मे रोजी होणार तर संस्कृत विषयाची २ जून रोजी होणारी परीक्षा ३ जून रोजी घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणाचा खेळखंडोबा भाजपाने मांडलाय – जयंत पाटील

News Desk

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा- अजित पवार

News Desk

पर्यटकांच्या सोयीसाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसर आकर्षक करणार! – आदित्य ठाकरे

News Desk