HW Marathi
महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात उत्साह

मुंबई | राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, नाशिक, ठाणे डोंबिवली आणि अन्य ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आल्या आहेत. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली आणि लोककलेची पर्वणी अशा कार्यक्रमांमुळे शोभायात्रेत अनेक रंगल्या आहेत. ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई नव वर्षाचे स्वागत करत आहे.  तर प्रत्‍येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्‍या आहेत. महिला आणि पुरुष मोटारसायकलींवर स्वार होवून शोभायात्रेचा आनंद घेत आहेत.

गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढल्या जातात. यंदाच्या गिरगावच्या स्वागत यात्रेत अनेक महिला बुलेटस्वारी करताना पाहायला मिळाते. या बुलेटस्वारीचे यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेकांनी देशभक्तीचे संदेश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. पारंपारिक पोशाखात महिला, तरुण मंडळी या मेळाव्यात सहभागी झालेत.

डोंबिवलीच्या भागशाळा मैदानापासून स्वागत यात्रा सुरू झाली आहे. फडके रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिक शोभायात्रेत सहभागी होत आहेत. चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले जाते. यंदाच्या शोभायात्रेत निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी जनजागृती करण्याचे संदेशही झळकताना पाहायला मिळत आहे.

 

Related posts

खाणीच्या खोदकामात आढळली प्राचीन मुर्ती

News Desk

कारागृहात मसाज, फेशियल, पेडिक्‍युअर सुविधा प्रकरणी इंद्राणी मुखर्जीची चौकशी होणार

News Desk

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

News Desk