HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह देशभरात बकरी ईद साजरी

मुंबई | इस्लाम धर्मातील मुस्लिम रमजान संपल्यानंतर ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा असेही संबोधले जाते. जगभरातील मुस्लीमांचा पवित्र सण ईद आहे. यानिमित्ताने देशभरात आज उत्साह पाहायला मिळतोय. बकरी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आज बकरी ईदच्या निमित्ताने बाजारपेठाही फुलल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना आजच्या दिवशी बकरी ईदनिमित्त सुट्टी असते. मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. नमाजनंतर घरांमध्ये बोकडांची कुर्बानी देऊन सुन्नते इब्राहीमी अदा साजरी होईल. त्यामुळे देशासह राज्यातही बकरी आणि बोकडांची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात बोकडांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

यावर्षी हा सण २२,२३ आणि २४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. ईद-उल-फितर नंतर मुस्लिम समुदायातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद. या दिवशी मुस्लिम बांधवांमध्ये चार पाय असलेल्या जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर बकरीच्या मांसाचे तीन भाग केले जातात आणि त्यानंतर त्याचे वाटप केले जाते.

काय आहे ? कुर्बानी देण्यामागे मुस्लिमधर्माची मान्यता…

हजरत इब्राहिम यांनी परंपरा सुरू केली. इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली.

अल्लाह ने एकदा हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांना त्यांची सर्वात प्रिय वस्तू कुर्बान करण्यास सांगितले असे मानले जाते. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना म्हातारपणात ‘अब्बा’ होण्याचा आनंद प्राप्त झाला होता. पण अल्लाहच्या आदेशासमोर ते त्यांचा मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते.

अल्लाहच्या मर्जीसमोर कुणाचे काहीही चालत नाही. इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बान देण्यासाठी त्याला घेऊन निघाले होते तेव्हा रस्त्यात त्यांची एका सैतानाशी भेट झाली. तो त्यांना म्हणाला, आता या वयात तुम्ही तुमच्या मुलाला का कुर्बान करायला निघाला आहात? सैतानाचे हे म्हणणे ऐकल्यावर त्यांचे मनही डगमगू लागले होते आणि ते विचारात पडले. पण काही वेळानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, त्यांनी अल्लाहला वचन दिलं आहे.

मुलाच्या प्रती असलेले प्रेम कुर्बानी देतेवेळी आड येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी जशी डोळ्यांवरील पट्टी हटवली तसा त्यांना त्यांचा मुलगा जसाच्या तसा जिवंत समोर उभा असल्याचे दिसले. अल्‍लाह ने चमत्‍कार केला आणि त्यांच्या मुलाच्या जागी ‘दुंबा’ला झोपवले असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे इब्राहिम यांच्या मुलाचे प्राण वाचले आणि ‘दुंबा’ कुर्बानी देण्यात आली. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात !

News Desk

विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा! – सामना

News Desk

सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता

News Desk