श्रीनगर | काश्मीर मधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या गोळीबारात लष्कराचे जवान बिकास गुरुंग शहीद झाले आहेत. रमजान ईदच्या दिवशी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाल्याचे पहायला मिळत आहे.
Jammu & Kashmir: Sepoy Bikas Gurung lost his life during ceasefire violation by Pakistan in Nowshera pic.twitter.com/gg3XwAaU9z
— ANI (@ANI) June 16, 2018
तसेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्या लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक केली. त्यांच्या हातात पाकिस्तान आणि आयएसचे झेंडे दिसून आले. जमावावर दगडफेक करणारे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यांना रोखण्यासाठी सुरुक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire at 0400 hours in Arnia sector; Border Security Force retaliated.
— ANI (@ANI) June 16, 2018
नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील एक जवान शहीद झाला. तसेच अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी चार वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन करण्यात आले. याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.