HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राकडून आरोग्यविभागाला पीपीई किट्स, आणि व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार

मुंबई | कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्याच्या आरोग्यविभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती, परंतू, कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता जर आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर आरोग्यविभागाकडे पुरेशी संसाधने हवी म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, नऊ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी रुग्णालयात लागणारी साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली तर राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य सर्व राज्यांनी त्यांच्या स्तरावर खरेदी करू नये केंद्र शासनाकडून त्याचा पुरवठा करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना पाठवण्यात आले आहे.

सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई कीटस्, तीन लाखाच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र शासनाकडे यासर्व साहित्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. राज्यात याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांना निर्देश दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

Aprna

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध – धनंजय मुंडे

News Desk

राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्या २ पीएंना सीबीआयचे समन्स! देशमुखांचीही चौकशी होण्याची शक्यता

News Desk