नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीने देशाची आर्थिक स्थिती ही फार बिकट जाली आहे. यावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महगाई भत्त्यामध्ये १ जानेवारी २०२० ते १ जुलै २०२१ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चालू आर्थिक आणि पुढील आर्थिक वर्षात सरकारला ३७ हजार ५३० कोटींचा फायदा होईल, असे सांगण्यात आले आहे.
Addl installment of Dearness Allowance (DA) payable to central govt employees & Dearness Relief (DR) to central govt pensioners, due from 1st Jan, 2020 shall not be paid. Addl installments of DA & DR from 1 July 2020 & 1 Jan 2021 shall also not be paid: Ministry of Finance (1/2) pic.twitter.com/j5SsuhYkko
— ANI (@ANI) April 23, 2020
महागाई भत्ता म्हणजे काय?
महागाई भत्ता म्हणजे भारतातील सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दरानुसार दिली जाणारी रक्कम. कर्मचाऱ्यांना महागाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी मूळ पगारावर (बेसिक सॅलरी) तत्कालीन महागाई दरानुसार काही टक्के रक्कम दिली जाते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.