HW News Marathi
Covid-19

घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्यास मुंबई महापालिकेला मोदी सरकारचा विरोध

मुंबई | देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.वयस्कर, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने फेटाळला आहे. घरोघरी म्हणजेच डोअर टू डोअर जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारचं कोणतही धोरण नसल्याचं सांगण्यात आल्याचं मुंबई मिररने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
मात्र एकीकडे हे उत्तर दिलेलं असतानाच दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी (बूथ पद्धतीने) कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली होती. लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) सुरेश काकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईमध्ये जवळजवळ दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. हे लोकं लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं आम्हाला सांगितलं. जर ही परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता.”
केंद्रीय आरोग्य मंत्रलायतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये सध्या करोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. केंद्र सरकारने तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष योजना तयार केली असून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. “अनेकांना लसीकरणासंदर्भात भीती वाटत असली तरी ते रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत. आपल्याला संसर्ग होईल अशी भीती त्यांच्या मनात आहेत. आम्ही आता लसीकरण तळागाळातील लोकांपर्यंत नेणार आहोत.
त्यामुळे लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नाही,” असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल त्या माध्यमातून लसीकरण करणं. अनेक देशांनी अशीच लसीकरण मोहीम राबवली आहे, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी हे २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार चर्चा

News Desk

आता २ तासांत उरका लग्न ! ठाकरे सरकारची नवी कडक नियमावली

News Desk

केरळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ!

News Desk