HW News Marathi
Covid-19

केंद्र सरकार २-३ दिवसांत नवे पॅकेज जाहीर करणार- नितीन गडकरी

मुंबई | कोरोनाने जगात थैमान घातले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. आता सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवे पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरीं यांनी दिली आहे. आज त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील उद्योग व वाणिज्य सदस्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान गडकरींनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत सरकार मदत पॅकेज जाहीर करेल. सरकारला आपल्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर झाला आहे. हे क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देते. केंद्र सरकार सर्व उद्योगांना सतत पाठिंबा देत आहे. व्यावसायिकांनीही हे समजून घ्यावे लागेल की सरकारची आर्थिक स्थितीदेखील दडपणाखाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी थाळ्या वाजवण्याचे फालतू उपक्रम साजरे केले नाहीत, सेनेनं मोदी सरकारला सुनावलं

News Desk

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य – अजित पवार

News Desk

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk