नाशिक | इगतपुरी कसारा घाटात आज (१८ जुलै) पहाटे प्रवासी साखर झोपेत असताना मुबंईहून गोरखपुरला जाणारी अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचे ( डाउन मार्गावरील) पहाटे चार वाजताच्या सुमारास गाडीच्या डब्याचे चाक रुळावरून घसल्याने मोठी दुर्घटना टळली. मोठा अपघात झाला असता तर जवळपास ५०० फूट खोल डब्बे खाली पडता पाडता वाचले. इंजिनचालकाने प्रसंगावधान राखून कुशलतेने ब्रेक्स दाबले. जर मागील आणखी दोन डबे घसरले असते.
Central Railway CPRO: One trolley of 2nd coach, of 12598 CSMT-Gorakhpur Antyodaya Express derailed between Kasara and Igatpuri ghat section at about 3.50 hours on 18.7.2019. No injury has been reported. Middle line & UP line are available for traffic. #Maharashtra
— ANI (@ANI) July 18, 2019
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की आज पहाटे मुंबई वरून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्सप्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमा २ पुलावर पहाटे ३:५० वाजता वळणावर मागून इंजिनपासून दुसरा डबा रुळावरून घसरत आल्याने भीमा टू पुलावर मोठा आवाज आल्याने चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबवली. यामुळे सर्वात मोठी दुर्घटना टळली. मात्र, जर पुलावरून डबा खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत आहे.
यावेळी रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप मार्गाने वळविण्यात आल्या असून गाडी पुलावरून बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मुंबईहून येणारी मुंबई गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेसचा एक डबा कसारा घाटात घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतुक सध्या तरी विस्कळीत झाली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र कसाऱ्या पुढील वाहतूक सध्या तरी ठप्प झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.