HW News Marathi
क्राइम

भुजबळ हे ‘भाई युनिव्हर्सिटी’चे प्राचार्य!- शिवसेना आमदाराचा आरोप

नाशिक | जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भुजबळांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला असून त्या विरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सुहास कांदे यांनी आज शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ही लढाई महाविकास आघाडीची नाही तर ज्यांनी बाळासाहेबांना तुरुगांत टाकण्याचा निश्चय केला होता, अशा व्यक्तीविरुद्धची आहे. ही लढाई भुजबळ व सुहास कांदे यांच्यामधील लढाई आहे. भुजबळ हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जिल्हा नियोजन निधीचे वाटप करण्याचा काहीही अधिकार नाही. तरीही त्यांनी यात हस्तक्षेप केला आहे.

भुजबळ फार्म येथे गेल्यावर जागोजागी भाईच्या टोळ्या दिसतात

‘भुजबळ फार्म येथे गेल्यावर जागोजागी भाईच्या टोळ्या दिसतात. भुजबळांची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे. भुजबळांनी केलेले वक्तव्य हे त्यांनाच लागू पडत असून छगन भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य आहेत’, असे सांगत शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पलटवार केला. नाशिक जिल्ह्यासाठी ७५० ते ८०० कोटींचा निधी आला होता. त्यातील ८० कोटी येवल्याला देण्यात आले, तर १२ कोटी रुपये नांदगावला देण्यात आले. या १२ कोटी रुपयांतील केवळ २ कोटी रुपये मला दण्यात आले. बाकीचा दहा कोटी रुपयांचा निधी कंत्राटदारांना परस्पर वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांना निधी वाटपाचा अधिकार नाही तरीही भुजबळ दबाव आणून निधी पळवत आहेत. प्रत्येक आमदाराला निधीचे समसमान वाटप होणे गरजेचे आहे. मात्र आपल्या मर्जीतील लोकांना जास्त व इतरांनी कमी निधी असा दुजाभाव भुजबळांकडून केला जातो आहे.

छगन भुजबळ हे ‘ भाई युनिव्हर्सिटी ‘चे प्राचार्य आहेत. त्यांच्या आजूबाजूला गुडांच्या टोळ्या असतात. एखादा भाजी विक्रेता २५ हजार कोटीचा मालक कसा होऊ शकतो, याचे उत्तर भुजबळांनी द्यावे. निधी वाटपात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे त्यांना पालकमंत्री पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांचे पालकमंत्रीपद काढावे, अशी मागणी मी स्वत: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे सर्व पुराव्यानिशी कागदपत्रे दिली आहेत. त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

Aprna

नाशिक पेट्रोलपंपावरील महिलेकडील चार लाखांची लूट

News Desk

कोल्हापूर एसीबीने केली १६ जणांवर कारवाई

News Desk