HW News Marathi
महाराष्ट्र

रेमडेसिवीर बाबतीत नाशिककांवर अन्याय, पालकमंत्री छगन भूजबळांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात ठाकरे सरकारमधील एका नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहित एक मागणी केली आहे. ३ दिवस सातत्याने संपर्क साधूनही अन्न व औषध प्रशासना आयुक्तांनी नाशिकला रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा केला नाही. त्यामुळे संतप्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. रुग्णसंख्येनुसार नाशिकला रेमडेसिवीरचा पुरवठा करा, अशी मागणीच भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे.

नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्याशी सातत्याने संपर्क करून पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील साठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे भुजबळ चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून नाशिक जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शन निश्चित सूत्रानुसार वितरण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी दररोज 10 हजार रेमडेसिवीरची मागणी असतांना नाशिकला केवळ 450 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरूपात म्हणजेच जवळपास 1600 हून जास्त इंजेक्शनचा दररोज पुरवठा केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या या शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक असतांना नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत असल्याचे भुजबळांनी या पत्रात म्हटले आहे.

धुळे व अहमदनगर जिल्ह्याकरिता देण्यात येणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे सदर साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी सुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो. रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे.

त्यामुळे इतर जिल्ह्यात जात असलेला साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांचे नावे देण्याबाबत सदर कंपनीचे अधिकारी यांना सूचित करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत येत असलेला रेमडेसिवीरचा साठा अतिशय कमी येत असल्याने नाशिककरांवर हा मोठ्या अन्याय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा साठा सुरळीत करून हा अन्याय आपण दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – अजित पवार

News Desk

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही? उदयनराजेंचा भुजबळांना सवाल  

News Desk

सोलापुरातील जि. प. शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

News Desk